सचिन वालावलकर यांच्या नेतृत्वाखाली 70 पदाधिकारी कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश: अर्चना घारेंना निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का…
वेंगुर्ले (प्रतिनिधी)-
शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांच्या नेतृत्वाखाली शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे वेंगुर्ले शहर कार्याध्यक्ष सुहास कोळसुलकर, तालुका उपाध्यक्ष सलील नाबर, युवक तालुका अध्यक्ष शुभम नाईक यांच्यासहित ७० जणांनी प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे. यामुळे आमदार तथा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे पारडे वेंगुर्ले तालुक्यात भक्कम झाले आहे. वेंगुर्ले तालुक्यात शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी विकासाची गंगा आणली आहे. जिल्हा समन्वयक सचिन वालावकर हे तालुक्यातील विविध विकासकामांसाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा करत आहे. मंत्री केसरकर यांच्या राज्यातील नेतृत्वामुळे वेंगुर्ले तालुक्यातील विकासाला वेग आला आहे. त्यामुळे दीपक केसरकर व सचिन वालावलकर यांच्या नेतृत्वार विश्वास ठेवून आम्ही शिवसेनेत प्रवेश करत आहोत, अशा भावना प्रवेशकर्त्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या. वेंगुर्ले तालुक्यातील मोचेमाड, न्हैचीआड, शिरोडा, वायंगणी, सुरंगपाणी, मठ व वेंगुर्ले शहर या भागातील सुमारे ७० युवक, युवती, महिलांनी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचा त्याग करून शिवसेनेत प्रवेश केला. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे वेंगुर्ले शहर कार्याध्यक्ष सुहास कोळसुलकर, तालुका उपाध्यक्ष सलीम नाबर, युवक तालुकाध्यक्ष शुभम नाईक व यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या या पदाधिकाऱ्यांना शिवसेनेत प्रवेश देण्यात आला. या सर्व प्रवेशकर्त्यांचे भगवी शाल व पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.
उबाठा व इतर पक्षातील ३० जणांचा शिवसेनेत प्रवेश
शिवसेनेचे वेंगुर्ले तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांच्या नेतृत्वाखाली उबाठा सेनेचे उपतालुकाप्रमुख विलास राऊत, पदाधिकारी वैभव नवार, गोट्या काळसेकर व स्वप्नील नवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ३० कार्यकर्त्यासमवेत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यामुळे उबाठा शिवसेनेला निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का बसला आहे.
वेंगुर्ले तालुका तालुक्यात शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे व उबाठा पक्षातील उभादांडा, भेंडमळा येथील महत्त्वाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे वेंगुर्ले तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर व वेंगुर्ले शहर प्रमुख उमेश येरम या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत केलेल्या प्रवेशामुळे शिवसेनेत पुन्हा उत्साही वातावरण झालेले आहे. या मोठ्या पक्ष प्रवेशामुळी दीपक केसरकर यांचे हात बळकट झाल्याच्या भावना शिवसेना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या.
शिवसेना पक्ष प्रवेशाला आले मेळाव्याचे स्वरूप
दीपक केसरकर यांच्या व्यस्त वेंगुर्ले दोऱ्यादरम्यान अचानक ठरलेल्या या पक्षप -वेश कार्यक्रमाला प्रवेशकर्त्यांची संख्या वाढल्याने मेळाव्याचे स्वरूप आले. मंत्री केसरकर प्रवेशकर्त्यांचे स्वागत करण्यासाठी कार्यक्रमस्थळी पोहोचू शकले नसले तरी शिवसेनेचे सर्व महत्वाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रवेशकर्त्यांचे उत्साहात स्वागत केले. जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांच्या नेतृत्वाखाली व जिल्हाप्रमुख अशोक दळवी, महिला जिल्हाप्रमुख अॅड. निता सावंत-कविटकर, महिला उपजिल्हाप्रमुख अर्चना पांगम, वेंगुर्ले तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, वेंगुर्ले शहर प्रमुख उमेश येरम्, केसरकर यांचे खाजगी सचिव गजानन नाटेकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनील डुबळे, उपजिल्हाप्रमुख सुनील मोरजकर, युवासेना जिल्हाप्रमुख हर्षद डेरे, युवक तालुकाप्रमुख स्वप्नील गावडे, महिला तालुकाप्रमुख दिशा शेटकर, कोस्टल विभाग तालुकाप्रमुख काशिनाथ नार्वेकर, युवक शहर प्रमुख सागर गावडे, कौशिक परब, रवी पेडणेकर, उमेश आरोलकर, सावंतवाडी तालुका महिला प्रमुख यशस्वी सौदागर, तळवडा विभाग महिला प्रमुख चैत्राली गावडे, भोमवाडी सरपंच विद्या वाडकर आदी यावेळी उपस्थित होते.
