‘संदेश’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन सोहळा रविवारी…

⚡बांदा ता.१४-: ज्येष्ठ नागरिक विकास मंच बांदा यांच्या सौजन्याने कवी हरिश्चंद्र भिसे लिखित आणि प्रभा प्रकाशन प्रकाशित ‘संदेश’ काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा रविवार दिनांक २० ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता येथील बांदा सोसायटीच्या (कै.) माधव हरी अळवणी सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.

नामवंत कवी स्तंभ लेखक अजय कांडर यांच्या हस्ते काव्यसंग्रहाचे प्रकाशन होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान बांदा ज्येष्ठ नागरिक विकास मंचचे अध्यक्ष प्रा. अन्वर खान भूषविणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वाई येथील प्रसिद्ध कवयित्री, ललित लेखिका डॉ. योगिता राजकर, समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाला साहित्य प्रेमिनी उपस्थित राहण्याचे आवाहन हरिश्चंद्र भिसे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page