रंगभरण स्पर्धेच्या विजेत्यांना आज कोलगाव सैनिक पतसंस्थेच्या कार्यालयात पारितोषिक वितरण…!

सावंतवाडी ता.१४-: पी.एफ. डॉन्टस फाऊंडेशन,सैनिक स्कूल आंबोली, सावंतवाडी नगर परिषद व सावंतवाडी तालुका पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने राणी पार्वती देवी हायस्कूल, सावंतवाडी येथे घेण्यात आलेल्या शालेय रंगभरण स्पर्धेमधील विजेत्यांना उद्या मंगळवारी १५ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ४:३० वाजता कोलगांव येथील सैनिक नागरी सहकारी पतसंस्थेच्या मारुती मंदिर नजीकच्या कार्यालयामध्ये पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत.
या रंगभरण स्पर्धेमध्ये पहिला गट – पहिली ते चौथी गटात .सौ.सुधाताई वामनराव कामत जि.पू.प्रा. शाळा क्र. 02 – सावंतवाडी,इयत्ता 4 थी मधील विद्यार्थी कु. दूर्वा अजित सावंत याने प्रथम क्रमांक पटकावला आहे.तर स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल,कोलगाव मधील इयत्ता – 3 रीतील कु.प्रार्थना प्रणय नाईक हिने
द्वितीय क्रमांक पटकावला आहे आणि मिलाग्रिस हायस्कूल मधील तिसरीतील कु.निधी प्रशांत सावंत हिने
तृतीय क्रमांक मिळवला आहे.तर उत्तेजनार्थ पारितोषिके मदर क्वीन इंग्लिश स्कूल, मधील – इयत्ता चौथीतील विद्यार्थिनी
कु.स्वराली आनंद हरम व जि. प. प्रा. शाळा क्र. 04, मधील चौथीतील विद्यार्थ्यिनी
कु.अनुप्रिया अजित राणे हिने पटकावला आहे या स्पर्धेमध्ये
इयत्ता पाचवी ते आठवी दुसरा गटात यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलमधील इयत्ता आठवीतील विद्यार्थी कु.मिनिक्षा विकास कुमार याने पटकावला आहे.
द्वितीय क्रमांक राणी पार्वती देवी हायस्कूल, सावंतवाडी, इयत्ता – आठवीतील कु.तन्वी प्रसाद दळवी याने पटकावला आहे
या स्पर्धेत तृतीय क्रमांक कळसुलकर इंग्लिश स्कूल,सावंतवाडी, इयत्ता – आठवीमधील विद्यार्थी वेणू अजित सावंत याने पटकावला आहे या स्पर्धेमध्ये उत्तेजनार्थ पारितोषिक माजगाव येथील श्री भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालयाची इयत्ता आठवी मधील
अब्दुलगनी आश्रफअली खान – श्री भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालय, याने पटकावला आहेत तर मळगाव इंग्लिश स्कूल मधील इयत्ता सातवीतील विद्यार्थिनी
तृप्ती जितेंद्र याडार हिने दुसरे उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले आहे. विजेत्याना सैनिक नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन बाबुराव कविटकर तसेच पीएफ डॉट्स फाउंडेशनचे अध्यक्ष जॉय डॉट्स पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील राऊळ सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहे तरी वेळेत पालकांसह विजेत्याने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे

You cannot copy content of this page