सावंतवाडी मतदार संघ आपल्यालाच मिळणार…

महेश सारंग यांचा विश्वास; मतदार संघातील आपली ताकद दाखविण्यासाठी एकदिलाने काम करा…

⚡सावंतवाडी ता.१४-: मतदारसंघात आपली असलेली ताकद पाहून ही जागा आपल्यालाच मिळणार आहे त्यासाठी तुम्ही सर्वजण दिवस रात्र काम करून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपल्या उमेदवाराला विजयी करूया असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे जिल्हा चिटणीस महेश सारंग यांनी आज इथे व्यक्त केला.

दरम्यान कोणी कितीही जरी तुम्हाला सांगितलं तरी आपण आपल्या पक्षावर विश्वास ठेवायचा या मतदारसंघात आपली ताकद अधिक आहे. सर्वाधिक ग्रामपंचायत देखील आपल्याच आहेत. त्यामुळे नक्कीच वरिष्ठ याचा विचार करतील आणि ही जागा आपल्यालाच मिळेल. त्यामुळे कोणीही न डगमगता एक दिलाने आपण काम करत राहावे असे आव्हान श्री सारंग यांनी यावेळी केले. ते सावंतवाडी येथील भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते.

यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, संजू परब अजय गोंदवळे, पक्ष निरीक्षक आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page