⚡देवगड ता.१४-: राष्ट्रवादी शरद पवार गटातील कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला आहे. यामध्ये वीरेंद्र (विरू) जाधव, वेदांत जाधव, चिन्मय जाधव, विशाल जाधव, आयान मुल्ला, तौसीब शेख, प्रमोद रेवंडेकर, देवेंद्र वाडेकर, संदेश जाधव, भीमसेन जाधव, आणि यश तांबे यांचा समावेश आहे.
यावेळी भाजपा पदाधिकारी बाळा खडपे, उत्तम बिर्जे, संदीप तावडे, प्रमोद जाधव, आणि मिलिंद माने उपस्थित होते.
आमदार नितेश राणे यांच्या विकासाभिमुख कार्यपद्धतीमुळे अनेक कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला असून, हे कार्यकर्ते आपल्या स्थानिक समस्या सुटण्यासाठी आणि आपल्या भागाचा विकास व्हावा म्हणून आ. नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली काम करू असे प्रवेश घेताना सांगितले.
