सरपंचांनी घेतलेल्या भुमिकेवर आम्ही ठाम व त्यांच्या भूमिकेला आमचा पाठिंबा ; उपसरपंच दिनेश सारंग

सावंतवाडी : माजी केंद्रीय मंत्री व रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार ना. नारायण राणे यांच्या पाठपुराव्याने प्रादेशिक पर्यटन विकास निधी मधून घ्यायच्या कामांसंदर्भात लोकसभा मतदारसंघातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील कामे पर्यटन दृष्ट्या अति महत्त्वाचे असल्याने तसेच पर्यटन दृष्ट्या यांचा विकास केल्यास निश्चितपणे पर्यटकांना फायदा होऊ शकतो. यासाठी २०२४ ते २५ वर्षाच्या प्रादेशिक पर्यटन विकास निधीतून सदरची कामे अग्रक्रमाने मंजूर करण्यात आली होती. यामध्ये सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव श्री सातेरी कलेश्वर मंदिर येथे सुशोभीकरण करणे यासाठी १९३.०१ लाख, सावंतवाडी तालुक्यातील वटवणे येथील तेरेखोल नदीच्या ऐतिहासिक संगमावर शिवशोभीकरण व पर्यटनासाठी निवाराशीड बांधून रस्ता मजबुतीकरण करणे यासाठी २५०.०० लाख, त्याचप्रमाणे सावंतवाडी तालुक्यातील गाळेल सिद्धेश्वर मंदिर येथील सुशोभीकरण करण्यासाठी ५०.०० लाख असा निधी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पंचायतराज तथा पर्यटन मंत्रालय यांच्याकडे पाठपुरावा करून मंजूर करून घेण्यात आला होता.

मात्र सावंतवाडीचे आमदार तथा शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी १ कोटी ९८ लाख रुपयांच्या निधी पैकी केवळ ९० लाख रुपये देऊन गावाची फसवणूक केल्याबद्दल आम्ही दीपक केसरकर यांच्या येणाऱ्या निवडणुकांच्या प्रचार यंत्रणेत सहभागी होणार नसल्याचे प्रसिद्धी पत्रकार द्वारे सरपंच यांनी सांगितले होते. त्यामुळे आमच्या गावावर अन्याय झाला असून आम्ही सरपंचांच्या भूमिकेवर ठाम आहोत व सरपंचानी घेतलेल्या भूमिकेला आपला पाठिंबा असल्याचे उपसरपंच दिनेश सारंग यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

You cannot copy content of this page