आम्ही जि प मतदार संघामधये बैठका घेऊन मंत्री केसरकर यांना मतदानसाठी सहकार्य करणार नाही

कोलगाव सरपंच संतोष राऊळ: आम्ही सदैव भारतीय जनता पार्टी व महेश सारंग यांच्या पाठीशी..

सावंतवाडी ता.१२-:

कोलगाव गावामध्ये कलेश्वर व सातेरी अशी दोन देवस्‌थाने असून व ह्या दोन्ही देवस्थानांचा प्रादेशिक पर्यटन योजने अंतर्गत सन. २०२४-२५ मध्ये विकास आराखड्यामध्ये १ कोटी ९८ लाख रुपयांचा पाठविण्यात आला आहे. परंतु मंत्री दिपक केसरकर यांनी आमच्या गावाच्या देवस्थानसाठी अवघे ९० लाख देऊन आमच्या गावाची पसवणूक केली आहे. आम्ही भारतीय जनता पार्टी व महेश सारंग यांच्या सदैव पाठीशी आहोत, असे प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात सरपंच संतोष राऊळ यांनी स्पष्ट केले आहे.

सदरील देवस्थानसाठी निधी कमी आला त्या कारणाने मंत्री दिपक केसरकर यांच्या प्रचारवर बहिष्कार असल्याचेही त्यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे. आम्हाला ९० लाख नकोच आहेत. आम्हाला १ कोटी ९० लाखच पाहिजेत. जर आम्हाला येवढी रक्कम न मिळाल्यास आमचा गाव आपल्या प्रचार यंत्रणेत सहभागी होणार नाही, असेही प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

You cannot copy content of this page