वैभववाडी प्रतिनिधी
मुंबई येथे गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत वैभववाडी तालुक्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था आयटीआय वैभववाडी या संस्थेचे नामांतर करण्यात आले असून 26 11 च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी विजय साळसकर यांचे नाव देण्यात आलं या निर्णयाचा तालुकावासीया कडून कौतुक होत आहे.
वैभववाडी तालुक्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था आयटीआय एडगाव येथे आहे या संस्थेत विविध व्यावसायिक प्रशिक्षण दिले जात आहे आता या प्रशिक्षण संस्थेचे शासनाने नामांतर केले आहे या गावचे सुपुत्र शहीद विजय साळसकर यांचे नाव या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला देण्यात आले शहीद साळस्कर हे मुंबई पोलीस दलात अधिकारी म्हणून कार्यरत होते मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावेळी दहशतवादांनी केलेल्या गोळीबारा ते शहीद झाले होते त्याच स्मारक देखील त्यांच्या मूळ गावी उभारण्यात आले आहे आता शासनाने यांचं नावच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला दिले आहे यांचा नामांतर सोहळा 14 ऑक्टोबरला आमदार नितेश राणे यांच्या हस्ते होणार आहे अशी माहिती भाजपचे उपाध्यक्ष आणि एडगाव गावचे माजी सरपंच प्रमोद रावराणे यांनी दिली आहे.
वैभववाडीतील आयटीआयला शहीद विजय साळसकर यांचे नाव…
