⚡सावंतवाडी ता.११-: ग्रामपंचायत माजगांव, महाराष्ट्र शासन व लोकनेते ॲड.दत्ता पाटील होमिओपॅथी मेडिकल कॉलेज आणि हाॅस्पिटल वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने,माजगाव येथे आरोग्य शिबीर घेण्यात आले.
यावेळी सरपंच डॉ. अर्चना सावंत, उपसरपंच संतोष वेजरे,ग्रा.प. सदस्य , संजय कानसे, ग्रामविकास अधिकारी आनंद परब, आरोग्य सेवक वेटे ,आशा सेविका, मेडिकल ऑफिसर डॉ.आकाश घाडी, प्राध्यापक डॉ.आर एस माधव, सौ. अपुर्वा गावडे, एलिना मेंडिस,राजा रेडकर , दिशा तोरसकर हर्षदा चव्हाण,सरजील,निब्रे ,आचल गांवकर,कु. मधुरा मेस्त्री व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. या शिबीराचा लाभ १५० ग्रामस्थांनी घेतला.
