सेंट्रल इंग्लिश स्कूलचे गणित संबोध परीक्षेत उल्लेखनीय यश…

⚡सावंतवाडी ता.११-: सार्वंतवाडी मर्कझी जमात बॉम्बे संचलित सेंट्रल इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी गणित संबोध परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले .

या परीक्षेत इ . ५ वी तील ११विद्यार्थी व इ. ८ वी तील
०८ विद्यार्थी असे एकुण १९ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले.
या परीक्षेत
इ .५ वी तील कु . चिराग रमाकांत राऊळ , कु . मोहम्मद माही अब्दुल कादिर खानापूरी , कु . मोहम्मद अश्मान असलम मकानदार , कु .मोहम्मद अम्मार अल्ताफ बागवान , कु . शादाब जुबेर शेख ,
कु . साक्षी प्रसाद खटावकर , कु .अनुजा राजेंद्र चौधरी , कु .गोहर हिदायतुल्ला खान, कु .सिद्धीका इरफान शेख , कु .उमर मोबिन मिर , कु . याशिका भागचंद रेगर व ८
वीतील कु .तलिश मुश्ताक खॉजा , कु . सोबिया इमरान शेख , कु . सिमराह शफी बेग, कु . देवार्य तुषार परुळेकर , कु . वसंत संदिप गवस , कु . मोहम्मद फैज जहिर शेख , कु . श्रेयस साईनाथ वंजारी , कु . चिराग कुमार नेरुरकर इ . विद्यार्थी पुढील गणित प्राविण्य परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. या विद्यार्थांना प्रशालेतील शिक्षिका श्रीम. फिरदोस खॉजा व श्रीम. तेहसीन मिर यांनी मार्गदर्शन केले.
सावंतवाडी मर्कझी जमात , बॉम्बे संस्थेचे सर्व पदाधिकारी , प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीम. निर्मला हेशागोळ सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्याथ्यांचे कौतुक केले व पुढील गणित प्राविण्य परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

You cannot copy content of this page