राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्हयाचे प्रतिनिधित्व करणार..
⚡मालवण ता.१०-: क्रीडा विभागाच्यावतीने मालवण येथील बोर्डींग ग्राउंडवर आज झालेल्या १७ वर्षीय मुलींच्या जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यांमध्ये भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कूल मालवणच्या या संघाने वैभववाडी संघावर ६ गुणांनी विजय मिळवला.या संघाची विभागस्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
जिल्हा क्रीडा विभागाच्यावतीने शालेय स्तरावर मालवण येथिल बोर्डिंग ग्राउंडवर आज क्रिकेट स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेचा अंतिम सामना भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कूल मालवण आणि वैभववाडी हायस्कूल यांच्यात झाला या सामन्यात भंडारी हायस्कूलच्या ऋतुजा वाक्कर हिने ३ विकेटस घेत ऊत्तम कामगिरी केली तर श्रावणी मालवणकरने उत्कृष्ट गोलंदाजी करत विजय मिळवून दिला या सामन्यात सर्व खेळाडूनी ऊत्तम खेळाच प्रदर्शन केल. विभागस्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी अंतिम विजयी ठरलेली भंडारी हायस्कूलचा संघ हा सिंधुदुर्ग जिल्ह्याच प्रतिनिधित्व करणार आहे. या विद्यार्थिनींना प्रशिक्षक संदीप पेडणेकर क्रीडा शिक्षक आर बी देसाई यांचे मार्गदर्शन लाभले
भंडारी हायस्कूलच्या या विजयी टीमचे संस्थेचे अध्यक्ष विजय पाटकर,संस्थेचे कोन्सिल ऑफ मॅनेजमेंट चे औनररी जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर , चेअरमन सुधीर हेरेकर मुख्यकार्यकारी अधिकारी वामन खोत मुख्याध्यापक एच बी तिवले व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे
