समाजाच्या जडणघाडणीत ज्येष्ठांचे योगदान खुप मोठे…

अर्चना घारे-परब:ज्येष्ठ नागरिकांच्या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद..

⚡बांदा ता.१०-: समाजाच्या जडणघाडणीत ज्येष्ठांचे योगदान हे खुप मोठे आहे. समाजाच्या, देशाच्या विकासासाठी ज्येष्ठांनी सातत्याने मार्गदर्शकच्या भूमिकेत राहावे असे प्रतिपादन राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ. अर्चना घारे-परब यांनी येथे केले.

ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या वतीने ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून येथील ग्रामपंचायत सभागृहात ज्येष्ठ नागरिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सौ. घारे-परब बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पोलीस निरीक्षक विकास बडवे, बांदा सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच राजाराम उर्फ बाळु सावंत, माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. अर्चना पांगम, नट वाचनालयाचे अध्यक्ष एस आर सावंत, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अन्वर खान, उपाध्यक्ष हनुमंत सावंत, राष्ट्रवादी युवक विधानसभा अध्यक्ष विवेक गवस, सौ. अनुराधा मोर्ये आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी वयाची पंच्याहत्तर वर्षे पूर्ण केलेले सभासद सुभाष नाईक, महादेव मोर्ये, वसंत हरमलकर, शरद्चंद्र महाबळ, पुंडलिक बांदेकर, याकुब आगा, अनंत देसाई, सुभाष राऊळ, दत्ताराम देसाई, तुकाराम मोरजकर, दत्ताराम गवस, शिवराम सावंत, रामचंद्र देसाई, प्रमोद अळवणी, गुंडू सातोसकर, नजमा खान, मनोहर नाईक यांच्यासह विविध क्षेत्रात योगदान दिलेले ‘सकाळ’चे प्रतिनिधी निलेश मोरजकर, महाराष्ट्र शासन आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षक जे. डि. पाटील, आरोसबाग येथील पोलीस भरती झालेली पहिली महिला शितल नाईक यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी मान्यवरानी मनोगते व्यक्त केलीत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुळशीदास धसामापूरकर यांनी केले. प्रास्ताविक व स्वागत अन्वर खान यांनी केले. सचिव गुरूनाथ नार्वेकर यांनी आभार मानले. यावेळी २०० हून अधिक सभासद उपस्थित होते.
देणगीचा ओघ
ज्येष्ठ नागरिक विकास मंच बांदा या संस्थेचे उपक्रम व सामाजिक जाणिवेतून करीत असलेल्या कार्यास अर्चना घारे- परब यांनी रूपये दहा हजारची देणगी संस्था अध्यक्ष यांचेकडे सुपूर्द केली. तर ज्येष्ठ संस्था सदस्य प्रमोद अळवणी यांनी २७३९४ रुपयेची रोख देणगी सुपूर्द केली. या व्यतिरिक्त वसंत हरमलकर, दत्ताराम गवस, नजमा खान व गुंडू सातोसकर यांनी प्रत्येकी एक हजार रुपयांची देणगी संस्थेस दिली.

You cannot copy content of this page