⚡मालवण ता.१०-: मालवण येथील देऊळवाडा प्राथमिक शाळेत नवरात्रौत्सवानिमित्त सरस्वती पूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. लायन्स क्लब मालवणच्या वतीने शाळेला आवश्यक असणारा ब्लूटुथ स्पीकर लायन्स प्रदान करण्यात आला.
शाळेत विविध कार्यक्रम घेण्यात येत असल्याने प्रत्येक वेळी स्पीकरची आवश्यकता भासत असल्याने लायन्स क्लबतर्फे हा ब्युटुथ स्पीकर भेट देण्यात आला. यावेळी शाळा प्रशासनाने लायन्स क्लब ऑफ मालवणचे आभार मानले. यावेळी मुख्याध्यापिका सौ. श्वेता यादव यांनी लायन्स क्लब सदस्यांचे स्वागत करून लायन्स क्लबच्या कार्याची माहिती मुलांना आणि पालकांना दिली. यावेळी लायन्स क्लब मालवणचे अध्यक्ष महेश अंधारी, खजिनदार सौ. पल्लवी खानोलकर, ज्येष्ठ शिक्षिका व लायन्स सदस्य सौ. जयश्री हडकर, मोहन पटेल, मुकेश बावकर, शाळेचे शिक्षक व इतर सहकारी, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.
