जिल्हास्तरीय शालेय स्केटिंगमध्ये भोसले इंटरनॅशनल स्कूलचे सुयश…!

⚡सावंतवाडी ता.०९-: ओरोस येथे झालेल्या जिल्हास्तरीय शालेय स्केटिंग स्पर्धेत येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी विविध गटातून सुयश प्राप्त केले. यामध्ये ११ वर्षाखालील मुलांच्या गटातून चौथीतील साईश मर्गी याने इनलाइन प्रकारात तर चौथीतीलच यश्मित ठाकूर याने कॉड प्रकारात प्रथम क्रमांक मिळवला. पाचवीतील साई गावडे याने द्वितीय क्रमांक मिळवला._
मुलींच्या गटातून पाचवीतील शुभ्रा संजीव देसाई हिने इनलाईन प्रकारात व सौम्या माधव हिने कॉड प्रकारात प्रथम क्रमांक मिळवला. १४ वर्षाखालील मुलींच्या गटातून आठवीतील नमिता काणेकर हिने इनलाईन प्रकारात प्रथम तर मुलांच्या गटातून सहावीतील अथर्व सावंत याने तृतीय क्रमांक मिळवला. १७ वर्षाखालील मुलांच्या गटातून नववीतील कृष्णा हळदणकर याने इनलाइन प्रकारात प्रथम क्रमांक मिळवला.
सर्व विद्यार्थ्यांची विभाग स्तरासाठी निवड झाली असून त्यांना शाळेचे क्रीडा शिक्षक सचिन हरमलकर व एस्तर परेरा यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले, अध्यक्षा ऍड.अस्मिता सावंतभोसले, सचिव संजीव देसाई आणि मुख्याध्यापिका प्रियंका देसाई यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page