सिंधुदुर्गनगरी ता ८
आंतरमहाविद्यालयीन सांस्कृतिक महोत्सव मयुरपंख स्पर्धेचे विजेतेपद उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे (कुडाळ) यांनी पटकावले असून त्यांनी आपली यशाची परंपरा कायम राखली आहे.
डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली आणि शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालय, खरवते – दहिवली यांचे सयुक्त विद्यमाने आयोजित आंतरमहाविद्यालयीन सांस्कृतिक युवा महोत्सव “मयुरपंख २०२४ ” खरवते- दहिवली येथे ४ ते ६ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत संपन्न झाला. उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे च्या ४० विद्यार्थ्यांच्या चमूने विविध स्पर्धा प्रकारात सहभाग घेऊन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले व दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील विजयाची उज्वल परंपरा कायम राखली आहे. कु. मल्हार महाजन या विद्यार्थ्याला गोल्डन बॉय तर कुमारी आरोही सावे हिला गोल्डन गर्ल ही विशेष पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. सहयोगी अधिष्ठाता डॉ.प्रफुल्ल माळी यांचे मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाचे सांस्कृतिक समन्वयक डॉ. राजेश राठोड, संघ मार्गदर्शक प्रा. हर्षवर्धन वाघ, डॉ.गिरीश ऊइके, डॉ.विजयकुमार पळसांडे, कु. सुषमा पालव यांच्या सहकार्यामुळे आणि सहभागी विद्यार्थ्याच्या मेहनतीने हे सुयश मिळाले आहे. अतिशय कमी कालावधीत विद्यार्थ्यांनी केलेल्या मेहनतीमुळे उद्यानविद्या महाविद्यालय मुळदेने यशाची परंपरा अबाधित ठेवण्यात यश मिळविले. याबद्दल सर्वच स्तरातून सर्वांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
