केसरकरांना भाजप नेत्यांकडून पोषक वातावरण नाही … म्हणून ‘धनुष्या’वर लढणार…

रूपेश राऊळ:रूपेश राऊळ: गद्दार सोडून कुणाचही स्वागत करू ..

⚡सावंतवाडी ता.०८-:
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे भाजपच्या वाटेवर होते मात्र त्या ठिकाणी नेत्यांकडून त्यांना पोषक वातावरण मिळाले नसल्याने ते धनुष्यबाणावरच लढणार असल्याचे पलटवार विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी आज येथे केला.

तर भाजपमधून राजन तेली हे उबाठामध्ये प्रवेश करणार या संदर्भात माझ्यापर्यंत काहीच माहिती नाही मात्र गद्दार सोडून तेलीच काय कोणीही आल्यास आम्ही त्यांचे उबाठामध्ये स्वागत करू असेही श्री राऊळ म्हणाले.

You cannot copy content of this page