तालुकास्तरीय कथाकथन स्पर्धेला स्पर्धकांचा उस्फुर्त प्रतिसाद…

⚡बांदा ता.०६-: शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी येथील नट वाचनालयच्या वतीने विष्णू नारायण गावकर आडाळी पुरस्कृत घेण्यात आलेल्या सावंतवाडी व दोडामार्ग तालुकास्तरीय कथाकथन स्पर्धेला स्पर्धकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. तिसरी ते चौथी गटात सर्वज्ञ सूर्यकांत वराडकर (जिल्हा परिषद केंद्रशाळा बांदा नं. १) याने तर पाचवी ते सातवी गटात चिन्मय विक्रम कोटणीस (सावंतवाडी) यांने प्रथम क्रमांक मिळविला.
तिसरी ते चौथी गटासाठी ‘मला आवडलेली कथा किंवा गोष्ट’ हा विषय ठेवण्यात आला होता. या गटात तन्मय तानाजी माधव, सई शिवाजी आरेकर यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविले. माही देविदास सरमळकर व संपदा संदेश पालव यांना उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आला.
पाचवी ते सातवी गटासाठी ‘साहसी कथा’ हा विषय देण्यात आला होता. या गटात देवांग उमेश पेडणेकर, पार्थ उमेश सावंत यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. नैतिक निलेश मोरजकर व दिव्यल दिनेश गावडे यांना उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आला. स्पर्धेचे परीक्षण प्राजक्ता चंद्रशेखर मुळीक व सौ. स्वप्नीता सावंत यांनी केले. दोन्ही गटातून ५० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला.
तत्पूर्वी स्पर्धेचे उदघाटन दीपप्रज्वलन व (कै.) विजयालक्ष्मी विष्णू गावकर व (कै.) बिपीन विष्णू गावकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून संपन्न झाले. यावेळी व्यासपीठावर वाचनालयचे अध्यक्ष एस. आर. सावंत, उपाध्यक्ष निलेश मोरजकर, कार्यवाह राकेश केसरकर, विशाखा गावकर, संचालक प्रकाश पाणदरे, शंकर नार्वेकर, सौ. स्वप्नीता सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी केंद्रशाळेचे मुख्याध्यापक शांताराम असनकर, आडाळी सरपंच पराग गावकर, ग्रंथपाल सुस्मिता नाईक, सहाय्यक ग्रंथपाल सुनील नातू, अमिता परब यांच्यासह पालक, शिक्षक उपस्थित होते. आभार निलेश मोरजकर यांनी मानले.
फोटो :-
बांदा नट वाचनालयात आयोजित कथाकथन स्पर्धेतील विजेत्यांसोबत उपस्थित मान्यवर.

You cannot copy content of this page