विलवडे शाळा नं.2 चे मुख्याध्यापक सुरेश काळे यांना यांना विशेष शैक्षणिक कार्य गौरव पुरस्कार प्रदान …

⚡सावंतवाडी ता.०६-: ना. दिपकभाई केसरकर शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री याच्यावतीने देण्यात येणारा विशेष शैक्षणिक कार्य गौरव पुरस्कार नुकताच मंत्री महोदयांच्या हस्ते मुख्याध्यापक सुरेश काळे यांना प्रदान करणेत आला. त्यांनी केलेल्या विशेष कार्याची दखल घेऊन त्यांना शाल, श्रीफळ, प्रशस्तीपत्रक व ग्रथभेट देऊन गौरविणेत आले.
याबद्दल सुरेश काळे यांचे विलवडे सरपंच प्रकाश दळवी, माजी उपसभापती कृष्णा सावंत, टेंबवाडी उत्कर्ष मंडळ मुंबई, केंद्रप्रमुख नरेंद्र सावंत, गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके, शिक्षक वृंद, शा. व्य. समिती, ग्रामस्थ व अंगणवाडीने विशेष अभिनंदन केले आहे.

You cannot copy content of this page