युनोस्को टीम 7 ऑक्टोबरला सिंधुदुर्ग किल्ला येथे येणार…

जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी किल्ले सिंधुदुर्ग येथे भेट देऊन किल्ले रहिवाशी यांच्याशी चर्चा केली..

मालवण दि प्रतिनिधी :
जागतिक वारसा म्हणून किल्ले सिंधुदुर्ग यांच्या संवर्धन व संगोपन करण्यासाठी युनोस्को टीम दि ७ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग किल्ला येथे येणार आहे. या पार्श्वभूमीवर
जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी किल्ले सिंधुदुर्ग येथे भेट देऊन किल्ले रहिवाशी यांच्याशी चर्चा केली. यावेळी तहसीलदार वर्षा झालटे, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, मुख्याधिकारी संतोष जिरगे यांसह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

जागतिक वारसा मालमत्तांच्या अनुक्रमांक नामांकनसाठी भारत सरकारने महाराष्ट्र आणि तामिळनाडूमधील एकूण 12 किल्ल्यांची निवड केली असून सदर किल्ले मराठा मराठा मिलिटरी लँडस्केप मध्ये समाविष्ट करण्याचा प्रस्ताव युनोस्कोकडे दिला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिंधुदुर्ग किल्ला व विजयदुर्ग किल्ला भारतीय पुरातत्व सर्वेक्षण सांस्कृतीक मंत्रालयाचे केंद्रीय संरक्षित स्मारक असून सिंधुदुर्ग किल्ला व विजयदुर्ग किल्ला यांना वारसा मालमत्तांच्या अनुक्रमांक नामांकन मिळालेले आहे. त्या अनुषंगाने सदर दोन्ही किल्ल्यांची पाहाणी व सर्वेक्षण करण्यासाठी युनोस्को तज्ञ टीम 6 ऑक्टोबर रोजी विजयदुर्ग व 7 ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग किल्ला येथे भेट देणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी किल्ले सिंधुदुर्ग येथे भेट दिली.

फोटो :

जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी किल्ले सिंधुदुर्ग येथे भेट देऊन किल्ले रहिवाशी यांच्याशी चर्चा केली

You cannot copy content of this page