राजन तेलींभोवती भानामतीचा चक्रव्यूह… ?

घरासमोर अज्ञाताकडून लिंबू आणून टाकल्याचा प्रकार उघड:असल्या कृत्यांना घाबरत नसल्याचा दिला इशारा..

सावंतवाडी: माजी आमदार राजन तेली यांच्या सावंतवाडी येथील घरासमोर लिंबूटिंबूचा प्रकार घडला आहे‌. अज्ञाताकडून हा प्रकार केला गेला आहे. निवडणूकांचे वारे वाहू लागले असताना राजन तेली निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. निवडणूक लढवणारच असा चंग त्यांनी बांधला आहे. नुकतीच त्यांनी भाजप नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती.

याच दरम्यान त्यांच्या घरासमोर लिंबूचा प्रकार घडला आहे.‌ याबाबत माजी आमदार राजन तेली यांनी नाराजी व्यक्त केली आहे. असल्या प्रकारांना भिक घालत नाही. निवडणूक लढण्यावर आपण ठाम आहे अशी प्रतिक्रिया श्री.तेली यांनी दिली आहे‌

You cannot copy content of this page