⚡सावंतवाडी ता.०४-: भाजपच्या वसंत स्मृती जिल्हा कार्यालय ओरोस येथे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा प्रवास निमित्ताने गुजरातचे सोशल मिडिया अध्यक्ष आणि प्रभारी डॉक्टर पंकज शुक्ला यांची सिंधुदुर्ग जिल्हा सोशल मिडिया कार्यकारिणी सोबत बैठक संपन्न झाली.
प्रदेश प्रवक्ते मा.अविनाश पराडकर यांनी त्यांचे स्वागत केले. जिल्हा संयोजक श्रीकृष्ण परब यांनी प्रास्ताविक केले आणि जिल्हा सोशल मीडियाचा आढावा दिला. याप्रसंगी प्रदेश प्रभारी समीर प्रभूगांवकर आणि जिल्हा कार्यकारणी सदस्य केतन आजगावकर यांनी अनुक्रमे कणकवली आणि सावंतवाडी मतदारसंघाचा आढावा दिला. युवा मोर्चा संयोजक मंदार पडवळ आणि अ.जा.जिल्हाध्यक्ष किरण जाधव यांनी मोर्चा/प्रकोष्ठ मधील सोशल मीडिया चर्चेत भाग घेतला.
कुडाळ मालवण मतदार संघातील राम बांदेलकर, सुमीत सावंत आणि टिम राकेश सावंत, निशय पाळेकर, संग्राम साळसकर यांनी कुडाळ, मालवण मतदार संघाचा आढावा दिला. बांदा मंडल संयोजक आशिष कल्याणकर यांनीही चर्चा सत्रात भाग घेतला. तिन्ही विधानसभेत भाजप सज्ज आहे असे आश्वासन याप्रसंगी मा. अविनाश पराडकर यांनी दिले.
दिवंगत सोशल मीडिया कार्यकर्ते अक्षय साईल याला श्रद्धांजली वाहण्यात आली.
आयटी संयोजक केशव नवाटे यांनी आभार मानले.
