घे भरारी फाऊंडेशनतर्फे ५ ऑक्टोबर रोजी ‘ गरबा नाईट ‘…!

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी शहरातील ‘घे भरारी फाऊंडेशन ‘तर्फे महिलांसाठी ‘गरबा नाईट’ चे आयोजन करण्यात आले आहे. येथील आर. पी. डी. हायस्कुलच्या पटांगणावर शनिवार ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ ते रात्री १२ वाजेपर्यंत हा ‘ नाविन्यपूर्ण गरबा कार्यक्रम ‘ संपन्न होणार आहे. या कार्यक्रमासाठी बेस्ट डान्सर, बेस्ट कॉस्च्युम, बेस्ट हेअरस्टाईल, बेस्ट एनर्जेटिक परफॉर्मन्स व अन्य आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहे.


तर उपस्थित रसिक प्रेक्षकांसाठी देखील लकी ड्रॉ कूपन ठेवण्यात आली असून या लकी ड्रॉ कूपन मधून प्रथम पारितोषिक ‘सोन्याची नथ ‘ द्वितीय ‘१ ग्रॅम सोन्याचा नेकलेस सेट, ‘ व तृतीय ‘मोत्यांचा हार’ व इतर आकर्षक गिफ्ट देण्यात येणार आहेत.
या ‘गरबा नाईट’ साठी महिला व मुलींना मोफत प्रवेश देण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त गरबा मंडळांनी तसेच प्रेक्षकांनीही या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन ‘घे भरारी फाउंडेशन ‘च्या संस्थापक अध्यक्षा मोहिनी मडगावकर, अध्यक्षा गीता सावंत, उपाध्यक्षा शारदा गुरव, सचिव मेघना राऊळ, खजिनदार मेघना साळगांवकर तसेच कार्याध्यक्षा रिया रेडीज यांनी केले आहे.

You cannot copy content of this page