⚡सावंतवाडी ता.०२-: नेहमी हातात बॅट घेऊन खेळणारी लहान मुले आज मात्र झाडु आणि कचऱ्याचा डबा घेऊन रोडच्या गटारामध्ये पडलेल्या प्लास्टिक पिशव्या, बाटल्यांचा कचरा गोळा करताना दिसली. देशभरात स्वच्छता सेवा अभियान सुरू असताना मळगावातील प्राथमिक शाळेत शिकणारी लहान मुले आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त स्वच्छतेचे महत्त्व ओळखून स्वतःहून कचरा गोळा करण्यासाठी घराबाहेर पडली,
मळगावातील नेमळे रोडच्या गटारामध्ये पडलेला कचरा वेचून दोन बाॅक्स कचरा त्यांनी गोळा केला. रोडच्या साईडला कचरा गोळा करताना लहान मुलांना पाहुन रोडवरुन येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांनी तसेच गावातील ग्रामस्थांनी मुलांच्या या कृतीचे कौतुक केले.
सोहम गावकर, दत्तप्रसाद तेली, नचिकेत गावकर, अक्षय गावकर, राज गावकर या लहान मुलांचा समावेश होता. मुलांनी केलेले काम पाहुन मळगावातील सामाजिक कार्यकर्ते श्री.नितेश तेली यांनी त्या मुलांना खाऊचे वाटप करुन कौतुकाची थाप दिली.
