⚡बांदा ता.०२-: विद्यार्थी प्रिय शिक्षिका म्हणून परिचित असलेल्या सौ. अनुराधा अच्युत पिळणकर (वय ७२) यांचे आज बुधवारी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने राहत्या घरी निधन झाले.
त्यांनी जयगड (जि. रत्नागिरी) येथून आपल्या शैक्षणिक सेवेची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध शाळांमध्ये ज्ञानदानाचे कार्य केले. मडुरा-बाबरवाडी तसेच शेर्ले शाळातील त्यांच्या उत्तम कामगिरीचे कार्य पाहून तत्कालीन शिक्षणाधिकारी हवालदार दीक्षित गडकर यांनी त्यांचे कौतुक करत गौरवही केला होता. एका दुर्धर आजाराने ग्रस्त असूनही त्यांनी ज्ञानदानाचे उत्तम कार्य केले होते.
ज्ञानदान करताना त्यांचे कार्यानुभव, संगीत, मराठी, इंग्रजी या विषयावर त्यांचे प्रभुत्व होते. विद्यार्थी प्रिय शिक्षिका म्हणून त्या परिचित होत्या. त्यांच्या पश्चात पती, तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. खेमराज मेमोरियल स्कूल बांदाचे माजी पर्यवेक्षक अच्युत पिळणकर यांच्या त्या पत्नी होत.
फोटो :-
अनुराधा पिळणकर.
अनुराधा पिळणकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन…!
