पोलीस अधीक्षक सौरभकुमार अगरवाल यांच्या हस्ते उदघाटन:जिल्हाभरातून एकूण अठरा भजन संघ सहभागी..
कुडाळ : श्री देव कुडाळेश्वर मंदिर येथे कुडाळ, येथे उद्या ३ ऑक्टोबर पासून श्री देव कुडाळेश्वर उत्सय मंडळ, कुडाळ आयोजित कै ऍड. श्री.अभय देसाई स्मृती ४९ वी सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय भजन स्पर्धा सुरु होत आहे. या भजनस्पार्धेत जिल्हाभरातून १८ भजन मांडले सहभागी झाली आहेत.
घटस्थापनेच्या मुहूर्तावर सुरु होणाऱ्या . या भजन स्पर्धेचा उद्घाटन समारंभ गुरुवार दि.०३ ऑक्सेबर २०१४ रोजी रात्रौ ८.०० वा. ऍड. सुहास सावंत, अध्यक्ष, सकल मराठा समाज, सिंधुदुर्ग यांचे अध्यक्षतेखाली.आणि उदघाटक जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अगरवाल,यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी लक्ष्मी नारायण पेट्रोलपंपचे अमेय देसाई, अमित सामंत, नगरसेवक .अभिषेक गावडे या मान्यवराच्या प्रमुख उपस्थित होणार आहे..
या भजन स्पर्धेत ३ ऑक्टोबर रोजी महापुरुष प्रा. भजन मंडड, पिंगुळी, दि.४ रोजी कुलस्वामिनी प्रा.भजन मंडळ, पावशी, दि-५ रोजी श्रीदेवी माऊली प्रा.क.मंडळ . इन्सुली, ब्राहमणदेव प्रा.भ.म. कुडाळ, उमळकर प्रा.भ.मे. कुडाळ, दि. ६ रोजी श्री देवी माऊली प्रा.भ. में, सासोली, दि.७ रोजी श्री देव ओम प्रा.भ.मे. आंदुर्ले, श्री सातेरी, कुडाळेश्वर, कुलस्वामिनी प्रा. भ. म.पावशी. दि.८ रोजी श्री देव रवळनाथ प्रा.भ.मंडळ . पिंगुळी, स्वराभिषेक भ.मं.तांबूळी, दि. ९ रोजी लिंगेश्वर प्रा.भ. मंडळ गिरगांव, सद्गुरु प्रा.भ-मंडळ कसबे, , श्री स्वामी समर्थ भजन, कालंबिस्त, दि.१० रोजी श्री लिंगेश्वर प्रा.भ.म. जानवली-कणकवली, दत्तप्रसाद प्रासादिक भजन मंडळ, वेंगुर्ला, काळंबा प्रा.भ. मंडळ डिगस, दि.११ रामकृष्णहरी भजन सेवा संघ, पाट, महापुरुष प्रा.भ.मंडळ पाट अशी भजने होणार आहेत. तरी सर्वानी भजनाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
