मालवणच्या स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती व लाल बहादुर जयंती साजरी…!

⚡मालवण ता.०२-:
मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय व एन एस एस विभाग यांच्यावतीने कॉलेजमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला प्रभारी प्राचार्य प्रा. कैलास राबते यांनी पुष्पहार अर्पण केला. तर राष्ट्रीय सेवा योजना विभागप्रमुख प्रा. डॉ. देविदास हारगिले यांनी लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यावेळी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या प्रमुख प्रा. डॉ. सुमेधा नाईक यांनी महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. डॉ.नाईक यांनी महात्मा गांधीजींच्या अहिंसा या संकल्पनेचा अर्थ मुलांना उलगडून सांगितला. त्याचबरोबर लालबहादूर शास्त्री यांच्या साधेपणाची विविध उदाहरणांच्या सहाय्याने माहिती दिली. तसे आचरण करण्याचे आवाहन मुलांना केले.

यावेळी प्रा. कैलास राबते यानी देखील महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. यावेळी महाविद्यालयातील सर्व स्टाफ, शिक्षकेतर कर्मचारी, अनेक विद्यार्थी व एनएसएस स्वयंसेवक उपस्थित होते.सूत्रसंचालन प्रा.डॉ. हंबीरराव चौगले यांनी केले तर आभार प्रा. शंकर खोबरे यांनी मानले.

You cannot copy content of this page