गणित संबोध परीक्षेत ओझर विद्यामंदिरचा १०० टक्के निकाल…

मालवण (प्रतिनिधी)

गणित अध्यापक मंडळ सिंधुदुर्ग यांच्यावतीने घेण्यात आलेल्या गणित संबोध परीक्षेमध्ये कांदळगाव येथील ओझर विद्यामंदिर प्रशालेचा निकाल १०० टक्के निकाल लागला आहे.

या परीक्षेमध्ये ओझर विद्यामंदिरच्या इयत्ता आठवीतील तृप्ती परुळेकर, केदार चव्हाण, विघ्नेश कुंभार, रिद्धी कदम, अमृता बागवे, ओमकार राणे, हर्षाली लाड, स्वप्नाली सुर्वे आणि भक्ती तेली असे एकूण नऊ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी पाच विद्यार्थ्यांनी विशेष श्रेणी तर दोन विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी प्राप्त केली आहे. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ओझर विद्यामंदिरचे गणित विषयाचे शिक्षक पी.के. राणे सर यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण साहाय्यक समितीचे अध्यक्ष- शेखर अर्जुन राणे, सचिव -जी.एस. परब, खजिनदार -शरद परब व सर्व संस्था चालक, शालेय समितीचे अध्यक्ष – किशोर नरे व सर्व सदस्य तसेच ओझर विद्यामंदिरचे मुख्याध्यापक डि.डि.जाधव आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

You cannot copy content of this page