बांदा/प्रतिनिधी
बांदा पंचक्रोशीतील ज्येष्ठ नागरिकांच्या मेळाव्याचे आयोजन रविवार दिनांक ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता बांदा ग्रामपंचायत सभागृहात करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिक विकास मंच बांदा पंचक्रोशी बांदा या संस्थेने या मेळाव्याचे आयोजन केलेले असून यावेळी वयाची पंच्याहत्तर वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिक सभासदांना शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात येणार आहे.
या मेळाव्यात बांदा पंचक्रोशीतील विविध क्षेत्रात विशेष प्रावीण्य व सन्मान प्राप्त व्यक्तीचा देखील सन्मान करण्यात येणार आहे. तरी मेळाव्यासाठी व कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्ष अन्वर खान व सचिव गुरुनाथ नार्वेकर यांनी केले आहे.
बांद्यात ६ रोजी ज्येष्ठ नागरिकांच्या मेळाव्याचे आयोजन…!
