⚡बांदा ता.२७-: कोकण संस्था गेली १३ वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्यासह अनेक राज्यात कार्यरत असून संस्थेने आपल्या कामाने राष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावा गावात कोकण संस्था ग्रामविकास कार्यक्रमांतर्गत वेगवेगळी कौशल्य विकास प्रशिक्षणे, अभ्यास सहली, आरोग्य शिबिर, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, व्यवसाय मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, गुड टच बॅड टच, मासिक पाळी व्यवस्थापन, स्त्री जन्माचे स्वागत, स्कुल किट वाटप, पाणलोट विकास, महिला मेळावा, पौष्टिक आहार, गाळमुक्त धरण, स्वच्छता कार्यक्रम, HIV, TB जनजागृती, पाणी शुध्दीकरण प्रकल्प, बांबू कारागिरांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम अशा अनेक प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते याबद्दलची माहिती देण्यात आली.
सामाजिक संस्थांचा कार्याचा सामान्य लोकांचे जीवनमान उंचावण्यात मोठा वाटा आहे असे सांगत अजून चांगल्या पद्धतीने ग्रामविकासाची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी मा.अनिल पाटील यांनी मार्गदर्शन केले आणि सामाजिक कार्यात आपण कायमच सहकार्य करत असल्याचे यावेळी सांगितले.
कोकण संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल यांनी जिल्हाधिकारी यांना पुष्पगुच्छ देऊन संस्थेच्या वतीने स्वागत केले.
याप्रसंगी संस्थेचे सिंधुदुर्ग जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक प्रथमेश सावंत, व्यवस्थापक शशिकांत कासले, सावंतवाडी प्रकल्प समन्वयक भगवान चव्हाण, कुडाळ प्रकल्प समन्वयक समीर शिर्के, निलेश खामकर आणि मुंबई प्रकल्प व्यवस्थापक सुदर्शन गमरे उपस्थित होते.
