भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका पूजा करलकर यांना राज्यस्तरीय ‘व्यसनमुक्ती व मधुमेहमुक्ती दुत’ पुरस्कार जाहीर…

⚡मालवण ता.२६-:
समर्थ सोशल फाउंडेशन व न्यूट्री व्हील हेल्थ प्रो.प्रा.लि. आणि शिवशंभू निवासी व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र अंतर्गत सुरू असणाऱ्या व्यसनमुक्त व मधुमेह मुक्त भारत अभियानामध्ये व्यसनी व मधुमेह असणाऱ्या लोकांना व त्यांच्या कुटुंबांना या त्रासातून बाहेर पडण्यासाठी मदत केल्याबद्दल संस्थेच्या वतीने भाजपच्या जेष्ठ माजी नगरसेविका पूजा करलकर यांना राज्यस्तरीय व्यसनमुक्ती व मधुमेह मुक्ती दुत या पुरस्काराने 29 सप्टेंबर रोजी सन्मानित केले जाणार आहे.

संस्थेच्या व्यसनमुक्ती व मधुमेह मुक्ती कार्यामध्ये भाग घेऊन एक आदर्श निर्माण केल्याबद्दल राज्यस्तरीय व्यसनमुक्ती व मधुमेह मुक्ती दुत या पुरस्काराने त्यांना गौरविण्यात येणार आहे. जुना पुणे बेंगलोर रोड कावळा नाका कोल्हापूर या ठिकाणी त्यांना पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

फोटो : पुजा करलकर

You cannot copy content of this page