⚡सावंतवाडी ता.२६-: भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या संकल्पनेतून सावंतवाडी मतदारसंघातील तब्बल सहा रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा कार्यक्रम थोड्याच वेळात पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर थोड्याच वेळात शहरातून भव्य बाईक मिरवणूक काढण्यात येणार आहे त्यासाठी जय तयारी करण्यात आले असून थोड्याच वेळात बाईक रॅली देखील सुरू होणार आहे.
या लोकार्पण सोहळ्याला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर गोव्याचे मंत्री जीत आरोलकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे
