सिंधुदूर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल,वेंगुर्लाचे यश…

⚡कुडाळ ता.२६-: क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय जिल्हा क्रीडा कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वेंगुर्ला तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत 17 वर्षाखालील मुले या गटातून सिंधुदूर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल, वेंगुर्ला या शाळेच्या विद्यार्थ्यांनी विजेतेपद पटकावले. त्यांची मालवण या ठिकाणी होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष इर्शाद शेख, संचालक प्रशांत नेरूरकर, सचिव दत्तात्रय परुळेकर, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.मनीषा डिसोजा तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे. पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

You cannot copy content of this page