उंबर्डे मोपेरकरवाडी येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या…!

वैभववाडी प्रतिनिधी
उंबर्डे मोपेरकरवाडी येथील अमोल परशुराम मोपेरकर वय 33 या अविवाहित तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली ही घटना बुधवारी दुपारी घडली.


मयत अमोल मोपेरकर हा आपली आई मालती मोपेरकर यांच्या सोबत राहत होता गेले काही महिने त्याची मानसिक स्थिती बिघडली होती. बुधवारी सकाळी त्याची आई मालती मोपेडकर या उंबर्डे येथे काही कामानिमित्त गेल्या होत्या त्यावेळी तो घरात एकटाच होता त्या दुपारी उंबर्डे वरुन परत आल्या तर घरात वाशाला रसीने गळफास घेतलेल्या स्थितीत अमोल दिसून आला त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर शेजाराने धाव घेतली मात्र तो मयत झाला होता याबाबत वैभववाडी पोलिसांना पोलीस पाटील विजय दळवी यांनी खबर दिली पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व मृतदेह वैभववाडी ग्रामीण रुग्णालय येथे शवस्चदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला त्याची मानसिक स्थिती बिघडल्यामुळे त्याने आत्महत्या केली असावी अशी शक्यता व्यक्त केली जात आहे त्यांच्या पश्चात आई भाऊ असा परिवार आहे.

You cannot copy content of this page