महास्वयंंम पार्टलवर नोंदणी केलेल्या उमेदवारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन…
⚡सावंतवाडी ता.२४-: येत्या २७ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सावंतवाडी येथील संस्थेत जिल्ह्यातील महास्वयंरोजगार पार्टलवर नोंदणीकृत खाजगी,सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग , शासकीय, निमशासकीय आस्थापना , स्टार्टअप्स , सहकारी संस्था , समाजिक संस्था , सेवा क्षेत्रातील खाजगी ,सार्वजनिक आस्थापना, कंपन्या, उपक्रम संस्था यांना लागणाऱ्या मनुष्यबळाचा पुरवठा करण्यासाठी भरती मेळाव्याचे आयोजन सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत करण्यात आले आहे.
तरी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण पोर्टलवर नोंदणी झालेल्या इयत्ता 10वी , 12 वी , पदविका , पदवीधर , पदव्युत्तर उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक पात्रतेच्या मूळ प्रमाणपत्रासह या संस्थेत उपस्थित राहावे.
शैक्षणिक अर्हतेप्रमाणे विद्यावेतन दिले जाईल , इयत्ता 10 वी , 12 वी , करीता रू. 6000/- , पदविका रू. 8000/- , तर पदवीधर व पदव्युत्तर रू. 10000/- प्रतिमाह विद्यावेतन दिले जाईल.
महाराष्ट्र शासन कौशल्य , रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग , शासन निर्णय क्रमांक : संकीर्ण – 2024 / प्र.क्र. 90 / व्यशि-3 , दिनांक 09 जुलै 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार भरती प्रक्रीयेची कार्यवाही करण्यात येणार आहे .
तरी जिल्ह्यातील सर्व नोंदणीकृत उमेदवारांनी उपस्थित राहावे असे आवाहन प्राचार्य /उपप्राचार्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सावंतवाडी यांनी केले आहे.
