⚡मालवण ता.२४-: मालवण वायरी येथील रेकोबा हायस्कूल येथे झालेल्या मालवण तालुकास्तरीय शालेय खो-खो स्पर्धेमध्ये कट्टा येथील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सुयश मिळविले. या स्पर्धेत १७ वर्षाखालील वयोगटात वराडकर हायस्कुलच्या मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. तसेच १४ वर्षाखालील मुलींच्या संघाने द्वितीय क्रमांक, १७ वर्षाखालील मुलांच्या संघाने द्वितीय क्रमांक व १९ वर्षाखालील मुलींच्या संघाने द्वितीय क्रमांक मिळविला.
या विद्यार्थ्यांना वराडकर हायस्कुलचे क्रीडा विभाग प्रमुख संजय पेंडूरकर, क्रीडा शिक्षक किसन हडलगेकर व भूषण गावडे, प्रशिक्षक बंड्या सावंत सौ. छाया कानूरकर यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल मुख्याध्यापिका सौ. देवयानी गावडे, कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त ॲड.एस एस पवार, कर्नल शिवानंद वराडकर, अध्यक्ष अजयराज वराडकर उपाध्यक्ष आनंद वराडकर, शेखर पेणकर, संस्था सचिव सुनील नाईक, श्रीमती विजयश्री देसाई, सहसचिव. एस.डी. गावडे, खजिनदार रविंद्र पावसकर शालेय समिती अध्यक्ष सुधीर वराडकर व सर्व संचालक मंडळाने अभिनंदन केले आहे.
