⚡मालवण ता.२४-: जिल्हा क्रीडा विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय सायकलिंग स्पर्धेमध्ये कट्टा येथील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत सुयश मिळविले आहे. या स्पर्धेत १९ वर्षाखालील मुलांच्या गटामध्ये सोहम विष्णू लाड याने प्रथम क्रमांक १४ वर्षाखालील मुलींच्या गटामध्ये कृतिका देवेंद्र लोहार प्रथम क्रमांक पटकावला असून सोहम लाड व कृतिका लोहार या दोघांची कोल्हापूर येथे होणाऱ्या विभागीय सायकलिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
तसेच १७ वर्षाखालील मुलींच्या गटामध्ये वैष्णवी पर्टे हिने तृतीय क्रमांक तर १७ वर्षाखालील मुलांच्या गटामध्ये सर्वेश कुंभार याने तृतीय क्रमांक पटकावत यश मिळविले. या सर्व विद्यार्थ्यांना वराडकर हायस्कुलचे क्रीडा विभाग प्रमुख संजय पेंडूरकर , क्रीडा शिक्षक किसन हडलगेकर व भूषण गावडे, सौ. प्रेरणा लोहार तसेच डॉ. बापू परब यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल मुख्याध्यापिका सौ. देवयानी गावडे, कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त ॲड.एस एस पवार, कर्नल शिवानंद वराडकर, अध्यक्ष अजयराज वराडकर, उपाध्यक्ष आनंद वराडकर, शेखर पेणकर, संस्था सचिव सुनील नाईक व श्रीमती विजयश्री देसाई, सहसचिव एस.डी गावडे, खजिनदार रवींद्र पावसकर शालेय समिती अध्यक्ष सुधीर वराडकर व सर्व संचालक मंडळ, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
