सुशांत नाईक यांचा आरोप:आपण शिवसेनेसोबतच असल्याचे प्रवेश दाखवलेले संतोष बाईत यांनी दिले स्पष्टीकरण..
देवगड (प्रतिनिधी)
देवगड – युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत आज नाडण गावात बैठक संपन्न झाली. यावेळी सुशांत नाईक यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला शनिवारी भाजप प्रवेश दाखवल्या संदर्भात चर्चा करण्यात आली. शनिवारी प्रवेश दाखवलेल्या संतोष बाईत यांनी आपली दिशाभूल करून प्रवेश घेण्यात आला असे सांगितले. आपण शिवसैनिकच आहोत आणि कायम राहणार असे स्पष्ट मत यावेळी संतोष बाईत यांनी दिले.
गावातील ग्रामस्थांची दिशाभूल करून आमदार नितेश राणे कणकवली विधानसभा मतदार संघात खोटे प्रवेश दाखवत आहेत असा घणाघाती आरोप यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी नितेश राणे यांचेवरती केला.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्यासोबत सरपंच सुनील जाधव, विभागप्रमुख रमा राणे, संजय तावडे,सुहास वाडेकर, शशांक तावडे, गणेश तानवडे, मोंडे, देवेंद्र घाडी, सुनील महाडिक, योगेश मिराशी, पिंटू नारकर, संतोष बाईत, आकाश मोरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
