जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विशाल परब यांच्य कडून जय भोसले यांच केल अभिनंदन…

⚡सावंतवाडी ता.२३-: स्वाभिमानी मराठी पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल श्री जय भोसले यांचे आज भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब यांनी पुष्पगुच्छ देत अभिनंदन केले आहे.

“भ्रष्ट अनितीला करा लक्ष्य… न्याय्य हक्कासाठी व्हा दक्ष” असे घोषवाक्य घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात स्वाभिमानी मराठी पत्रकार संघ कार्यरत आहे. पत्रकारितेतील नैतिकता जपणाऱ्या संघाचा संपूर्ण महाराष्ट्रात एक दबदबा राहिला आहे. श्री जय भोसले यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर याच पद्धतीने संघटनेचे कामकाज चालू राहील असा विश्वास श्री विशाल परब यांनी व्यक्त करत श्री जय भोसले यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी भाजपा ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष श्री दिलीप भालेकर, सोशल मीडिया प्रमुख श्री केतन आजगावकर, श्री सुधीर आडीवरेकर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते

You cannot copy content of this page