कणकवली तालुक्यातील बिडवाडी येथील विशाल संजय पोळ यांचा भाजप पक्षांमध्ये प्रवेश…

आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीत ओम गणेश वर केला पक्षप्रवेश..

कणकवली : बिडवाडी गावचे विशाल संजय पोळ यांनी आज आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात जाहीर प्रवेश केला. बिडवाडी गावविकासासाठी आमदार नितेश राणेंच्या माध्यमातून न्याय मिळू शकतो. ग्रामस्थांच्या प्रश्नांना न्याय देणे महत्वाचे आहे. आमदार नितेश राणे यांची कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून गाव विकासासाठी भाजपात प्रवेश केला असल्याचे विशाल पोळ यांनी सांगितले.

ओम गणेशवर झालेल्या पक्षप्रवेशावेळी गोट्या सावंत, मिलिंद मेस्त्री, संदीप सावंत, प्रशांत चव्हाण, आनंदराव साटम, दादा भोगले, अनंत मगर, पांडूरंग मगर, आदी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page