मालवण भरड येथील दत्त मंदिरातील सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम…

⚡मालवण ता.२३-:
मालवण भरड येथील श्री दत्त मंदिरात दत्त मंदिर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे आयोजित गणेशोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त २८ सप्टेंबर रोजी सायं. ६ वा. सवाल- जबाब संगीत भजनबारी होणार आहे. ही बारी राजापूर तालुक्यातील पाचल नारकरवाडी येथील हनुमान भजन मंडळाचे बुवा तेजस नारकर (पखवाज साथ विवेक पांचाळ, तबला साथ प्रशांत जोशी) आणि पावशी-कुडाळ येथील देवी सातेरी भजन मंडळाचे बुवा अरुण घाडी (पखवाज साथ विनित धुरी, तबला साथ जितेश परब) यांच्यात रंगणार आहे. २९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता देवगड तालुक्यातील नाद भोळेवाडी येथील ब्राह्मण देव महिला मंडळाचे समई नृत्य होणार आहे. १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता संगीत विशारद मान्यता कुंटे यांचा सुगम संगीताचा नजराणा ‘संगीतसंध्या’ हा अभंग आणि नाट्यगीतांचा कार्यक्रम होणार आहे. यात हार्मोनियम साथ भजनसम्राट भालचंद्र केळुसकर, पखवाज साथ विशाल केळुसकर, तबलासाथ सुधीर गोसावी, निवेदन विनोद सातार्डेकर हे करणार आहेत. सर्वांनी उपस्थित राहवे, असे आवाहन दत्त मंदिर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page