⚡मालवण ता.२३-: बेरोजगार युवक – युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण’ ही योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत विविध कंपन्या, आस्थापना, शासकीय, निमशासकीय व खाजगी संस्था/कार्यालये आदीमध्ये सहा महिन्यांसाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यादृष्टीने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मालवण या संस्थेमध्ये दि. २४ रोजी सकाळी ११ वाजता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
उमेदवार दहावी अथवा बारावी उत्तीर्ण असल्यास ६००० रुपये विद्यावेतन, उमेदवार औ. प्र. संस्था अथवा पदविका प्रशिक्षण उत्तीर्ण असल्यास ८००० रुपये विद्यावेतन, उमेदवार पदवीधर अथवा पदव्युत्तर उत्तीर्ण असल्यास १०००० रुपये विद्यावेतन मिळणार आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन प्राचार्य सचिन संखे यांनी केले आहे.
