⚡सावंतवाडी ता.२१-: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिकचे अभ्यास केंद्र बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी उद्बोधन कृतिसत्र हा शैक्षणिक उपक्रम आयोजित करण्यात आला होता, मुक्त विद्यापीठ आणि मुक्त शिक्षण प्रणाली याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
सदर कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून प्रा. श्याम महादेव चव्हाण आणि प्रा. धिरज रेवण पाचपिले (राज्यशास्त्र विभाग) उपस्थित होते, तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य तथा अभ्यास केंद्राचे प्रमुख डाॅ.एम.बी.चौगले उपस्थित होते…
या उपक्रमाबाबत माहिती देताना प्रा.चव्हाण सरांनी आपल्या वक्तव्यात मुक्त विद्यापीठाच्या पदवी समकक्षतेबाबत विचार मांडले, तर प्रा.पाचपिले सरांनी दुरस्त शिक्षण विभाग तसेच युपीएससी, एमपीएससी परीक्षाबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.एम.बी.चौगले यांनी १९९१ पासून ते २०२४ पर्यंत विद्यापीठातील आधुनिक बदलांचा आढावा घेतला तसेच स्पर्धांपरीक्षांमध्ये मुक्त विद्यापीठाची उपयुक्तता, क्रिडामहोत्सव, आविष्कार, युवक महोत्सव याबाबत सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाला अभ्यास केंद्र संमंत्रक तसेच विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अभ्यास केंद्राचे केंद्रसंयोजक डाॅ.जी.पी धुरी यांनी केले, तर आभारप्रदर्शन केंद्र सहायक डाॅ.एस.व्ही.परुळकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री.सुनिल आळवे आणि श्री.मोहन मोबारकर यांनी सहकार्य केले.
