जिल्हा रुग्णालयासाठी २२ रोजी कुडाळवासियांची बैठक…!

⚡कुडाळ ता.२०-: कुडाळ शहारामध्ये जिल्हा रुग्णालय होण्याच्या मागणी करिता रविवार दिनांक 22 सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजता बैठक श्री देव मारुती मंदिर धर्मशाळा बाजारपेठ कुडाळ येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे.
जिल्हा रुग्णालय ओरस येथे मेडिकल कॉलेज झाल्याने जिल्हा रुग्णालय कार्यान्वित नाही. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. कुडाळ येथे ग्रामीण रुग्णालय ईमारत निर्लेखित करून ग्रामीण रुग्णालय आवारात अद्ययावत जिल्हा रुग्णालय व्हावे जेणेकरून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांवर योग्य इलाज होतील.
तरी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने या बैठकीला उपस्थित राहावे, असे आवाहन कुडाळ विकास समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page