⚡आंबोली,ता.१७ अनिल चव्हाण-: चौकुळ पंचक्रोशीतील शैक्षणिक, सामाजिक, आणि सांस्कृतिक कार्यात आपल्या स्थापनेपासूनच आघाडीवर असणाऱ्या श्री देवी सातेरी भावई शिक्षण संस्था, चौकुळ, (रजि.) तर्फे आज चौकुळ कनिष्ठ महाविद्यालय, चौकुळ च्या सर्व विद्यार्थि विद्यार्थिनींना (अकरावी आणि बारावी) पाठीवरच्या बॅग चे वितरण करण्यात आले.
संस्थेच्या विश्वस्त मंडळाच्या धोरणानुसार जिथे कमी, तिथे आम्ही या उक्ती चे पालन करत विशेष करून कष्टप्रद शिक्षण घेत असलेल्या कोणाही विद्यार्थि विद्यार्थिनींला शिक्षणासाठी आवश्यक गोष्टीची कमतरता भासू नये असा प्रयत्न संस्थेचा यापुढेही रहाणार आहे. “गावचा शैक्षणिक विकास, हाच आमचा ध्यास” असल्याने येणाऱ्या काळात त्यानुसार कार्यरत रहाण्यास संस्थेचे विश्वस्त मंडळ कटिबद्ध आहे. याकामी दिलेल्या सहकार्याबद्दल विश्वस्त मंडळ चौकुळ कनिष्ठ महाविद्यालय, चौकुळ च्या स्थानिक कार्यकारी समितीचे आणि प्राध्यापक वर्गाचे आभारी आहे. सदर भेटवस्तूचे वितरण करण्यासाठी पुढाकार घेऊन विध्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्याबद्दल संस्थेचे खजिनदार श्री उल्हास भास्कर पनवेलकर आणि संस्थेच्या सचिव सौ. संजना (उज्वला) सं. परब यांचे ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.
