प्रभाकर सावंत यांनी पालकमंत्री व त्यांचे पी.ए यांची तळी उचलणे बंद करावे…

आशिष सुभेदार:उपरकरांवर टीका करण्यापूर्वी आपले राजकारणातील योगदान तपासावे त्यानंतरच टीका करावी..

⚡सावंतवाडी ता.१५-:
भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी पालकमंत्री व त्यांचे पी.ए यांची तळी उचलणे बंद करावे कार्यकारी अभियंत सर्वगौड यांच्याबद्दल व त्यांनी केलेल्या बहुतांशी निकृष्ठ कामाबद्दल माजी आमदार जी.जी.उपरकर हे योग्य वेळी पुरावे उघड करतीलच मात्र सावंत यांनी उपरकरांवर टीका करण्यापूर्वी आपले राजकारणातील योगदान तपासावे त्यानंतरच टीका करावी असा पलटवार सामाजिक कार्यकर्ते तथा मा आमदार उपरकर समर्थक आशिष सुभेदार यांनी केला आहे.


कणकवलीचे कार्यकारी अभियंता सर्वगौड यांच्यावर जी सातत्याने टीका उपरकर करत आहेत ती योग्यच आहे कोणत्याही राजकीय हेतूने अथवा आमिषाला बळी पडून त्यांच्याकडून टीका केली जात नाही.मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्घटनेनंतर जिल्हयातील सार्वजनिक बांधकाम विभागाचा अनागोंदी व भ्रष्टाचारी कारभार चव्हाटयावर आला आहे.उपरकर यांनी सातत्याने सार्वजनिक बांधकाम अभियंता श्री सर्वगोड व विभागाच्या निकृष्ट कामे,भ्रष्टाचारी कारभार याबद्दल सातत्याने जिल्हयाचे पालकमंत्री,प्रशासनाचे अधिकारी यांना कल्पना दिली होती.कित्येकवेळा निकृष्ट कामांची पोलखोल देखील त्यांनी केली.मात्र तरीही त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आणि त्यामुळेच मालवण राजकोटची दुर्घटना घडली हे सत्य नाकारुन चालणार नाही.ज्यांना राजन तेली यांनी जिल्हाध्यक्षपदी बसवले त्याच तेलींवर पलटवार करणा-या प्रभाकर सावंत यांनी उपरकर यांच्याविषयी बोलू नये आपली राजकारणातील कारकिर्द व योगदान त्यांनी तपासावे.कार्यकारी अभियंता सर्वगौड यांच्याकडून बेनामी कामे मिळवत असल्याने सावंत हे त्यांची तळी उचलत आहे.जी.जी.उपरकर यांनी जिल्हयात मोठे योगदान दिले आहे.त्यांची राजकारणातील कारकिर्दही तपासून पहावी त्यामुळे भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांची त्यांच्यावर टीका करण्याची पात्रता नाही.पालकमंत्री व त्यांचे पी.ए.हे जनता दरबारात अधिका-यांना धमकावतात मात्र ज्यावेळी निकृष्ट कामे होत होती त्यावेळी ते कुठे होते. मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील १०० फुटी झेंडा तातडीने का उतरवला गेला? असा सवाल ही सुभेदार यांनी केला आहे.

You cannot copy content of this page