तुम्हा कर्मचाऱ्यांच्या एकजुटीमुळे संप यशस्वी…

अनुप नाईक:कुडाळमध्ये एसटी कृती समितीच्या वतीने अनुप नाईक यांचा सत्कार..

⚡कुडाळ ता.०६-: एसटीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी माझा केलेला हा सत्कार हा माझा एकट्याचा नसून सर्व कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या एकजुटीचा हा सत्कार आहे, असे प्रतिपादन एसटी खार सेनेचे जिल्हाध्यक्ष अनुप नाईक यांनी केले. एसटी कामगारांच्या संपात महत्वाची भूमिका बजावलेल्या अनुप नाईक यांचा आज कुडाळ एसटी आगारात कृती समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला, त्यावेळी श्री. नाईक बोलत होते.


गणेशोत्सवाच्या तोंडावर नुकताच एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संप केला. राज्य सरकारने कामगार संघटनांची चर्चा करून एसटी कामगारांना 2020 पासून 6500 रुपयांची वेतनवाढ जाहीर केली.या कामांमध्ये एसटी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अनुप नाईक यांनी सिंधुदुर्गातील एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने महत्त्वाची भूमिका बजावली. त्यासाठी आज त्यांचा कुडाळ एसटी आगारामध्ये सर्व संघटनांच्या कृती समितीच्या वतीने आणि सर्व एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. रोशन तेंडुलकर आणि अमोल परब यांनी यांच्या हस्ते अनुप नाही यांनी हा सत्कार स्वीकारला.
यावेळी बोलताना अनुप नाईक यांनी एसटी कामगारांना जी साडेसहा हजार रुपयांची पगार वाढ झाली आहे त्याबाबत विश्लेषण केले. 2020 पासून ही पगार वाढ धरली जाणार आहे. त्यामुळे ज्यांचा 2020 मध्ये चार हजार पगार वाढला होता त्यांना अडीच हजार रुपये, यांचा 5000 पगार वाढला होता त्यांना दीड हजार रुपये आणि त्यांचा अडीच हजार पगार वाढला होता त्यांना 4000 रुपये पगारवाढ मिळणार असल्याचे नाईक यांनी यावेळी स्पष्ट केले. सर्वच एसटी कामगार संघटनांनी यावेळी एकजूट दाखवल्यामुळे शासनाला पगार वाढ करणे भाग पडले आणि आपल्या एकजुटीचा विजय झाला असल्याचे नाईक यांनी यावेळी सांगितले. आपण सर्व कर्मचाऱ्यांनी माझा केलेला सत्कार हा माझा एकट्याचा नसून सर्व एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने मी हा सत्कार स्वीकारत आहे असे नाईक यांनी यावेळी बोलताना सांगितले.
या कार्यक्रमाला महाराष्ट्र एस टी कामगार सेना अध्यक्ष आशिष डीचोलकर, सचिव अमोल परब, सेवा एसटी कामगार संघटना विभागीय सरचिटणीस रोशन तेंडोलकर, प्रशांत गावडे, कामगार संघटना सचिव एम एन आंबेसकर, नितेश राऊळ, राजेश नागडे, वैभव येसाजी, सोनाली तेरसे, गंगाराम खरात, निलेश शिरोडकर, योगेश परुळेकर, रुपेश टेमकर, मुश्ताक खूल्ली, ए. बी. फर्नांडिस, संतोष धुरी, अनिल कामतेकर, आदिनाथ म्हापणकर, राजेश मसुरकर, संदीप रासम, साईनाथ पारकर, सुनील करलकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन एम. एन. आंबेस्कर यांनी केले.

You cannot copy content of this page