कबुलायदार गावकर जमीन प्रश्नावरकाहीजण जाणीवपूर्वक मला राजकीय डॅमेज करण्याचा प्रयत्न…

मंत्री दिपक केसरकर:तर गेळे कबुलायदार प्रश्न पूर्णपणे सोडवला जाणार..

⚡सावंतवाडी ता.०५-:
तालुक्यातील कबुलायदार गावकर जमीन प्रश्नावर काहीजण जाणीवपूर्वक मला राजकीय दृष्ट्या डॅमेज करण्याचा प्रयत्न करत आहे बाबत मी वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

तर गेळे कबुलायदार प्रश्न पूर्णपणे सोडवला जाणार आहे त्या ठिकाणी असलेल्या टाऊन प्लॅनिंग मध्ये वन लागले असल्याने तेथे काहीच विकास साध्य नाही. हा झोन रद्दचा प्रस्ताव मंत्रालय पातळीवर आहे त्यामुळे लवकरच गेळे जमीन वाटपाचा प्रश्न मार्गी लागेल विश्वासही केसरकर यांनी व्यक्त केला.

ते म्हणाले मालवण येते छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य पुतळा. उभारण्यात येणार आहे त्यासाठी जागाही निश्चित करण्यात आल्याचे ते म्हणाले जिल्हाधिकाऱ्यांची बदली ही त्यांच्या मागणीनुसार झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आज तहसीलदार कार्यालयात कबूलायतदार जमीन प्रश्न संदर्भात जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या उपस्थितीत बैठक झाली या बैठकीत काही निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले यावेळी उपवनसंरक्षक नवक किशोर रेड्डी उपस्थित होते

You cannot copy content of this page