बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या युवासेना जिल्हाप्रमुखपदी मेहुल धुमाळे…

⚡कणकवली ता.०३-: बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या कणकवली विधानसभा मतदारसंघाच्या युवासेना जिल्हाप्रमुख पदी कणकवलीतील मेहुल उत्तम धुमाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सूचनेनुसार व युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.

आमदार रवींद्र फाटक यांच्या हस्ते श्री. धुमाळे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. युवा सेना सरचिटणीस राहुल कनाल, अमेय घोले, सचिव दीपेश म्हात्रे, किरण साळी, यांच्या पत्रानुसार ही नियुक्ती देण्यात आली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे विचार व धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण आत्मसात करून व इतरांपर्यंत पोहोचवण्याबाबत काम करण्याचे आदेश या नियुक्तीपत्र द्वारे देण्यात आले आहेत.

You cannot copy content of this page