कोटकामते दहिबाव पुलाला मंजुरी ५ कोटी निधीची तरतूद…

ग्रामीण भागात सिमेंटकाँक्रीटचे रस्ते करण्याचा पालकमंत्र्यांचा क्रांतिकारी निर्णय सदाशिव ओगले यांची माहिती:देवगड तालुक्यातील जनता दरबारात अनेक प्रश्न मार्गी..

देवगड (प्रतिनिधी) २ सप्टेंबर २०२४

देवगड तालुक्यातील कोटकामते दहिबाव पुलाचे अनेक वर्षाची मागणी पूर्णत्वास जाणार असून या पुलाच्या बांधकामासाठी ५ कोटी रुपयांचा निधी तरतूद पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून , मजूर झाला आहे याची आग्रही मागणी जनता दरबारात करण्यात आली होती.यात आम्.नितेश राणे यांचेही योगदान आहे.या पुलाच्या बोअर टेस्टिंग चे काम सुरू झाले आहे. तसेच प्राथमिक कामाला सुरुवात झाली असून या पुलामुळे सुमारे १५ किलोमीटर देवगड ते कणकवली हे अंतर कमी होणार आहे.
नागरिकांची गेली कित्येक वर्षाची मागणी पूर्ण होणार आहे अशी माहिती माजी प.स.सदस्य भाजपा नेते सदाशिव ओगले यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार रवींद्र चव्हाण यांनी १२ ऑगस्ट २०२४ रोजी आयोजित केलेल्या जनता दरबारात ही मागणी करण्यात आली होती. याबरोबर देवगड तालुक्यातील अन्य समस्या व मागण्यांबाबत लेखी पत्र व्यवहार व चर्चा जनता दरबारात करण्यात येऊन अन्य विकास कामे व समस्या ही मार्गी लागल्या असल्याची माहिती सदाशिव ओगले यांनी दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले , खुडि किंजवडे, तोरसोळे, या गावातील नागरिकांना शेतकरी सन्मान निधी आजपर्यंत तो बंद आहे  हा १ जानेवारी २०२२ सुरू झालेल्या या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नसून  तो सुरू करण्याकरता प्रयत्न सुरू होते या गावातील नागरिक देवस्थान इनाम व असे कुळे दोन प्रकारात मोडतात १२ ऑगस्ट रोजी झालेल्या जनता दरबारात संबंधित यंत्रणा ,पालकमंत्री यांनी शेती कसेल त्यांची शेती असे सांगून अपात्र ठरविलेल्या शेतकऱ्यांना शासकीय आदेश काढावा अशी मागणी करण्यात येऊन स्थानिक आमदार नितेश राणे यांनी या बैठकीत ही मागणी  केली त्यानुसार या गावातील सुमारे २०० कुटुंबांना बंद असलेली शेतकरी सन्मान योजना सुरू करावी यासाठी शासनाने तात्काळ योग्य ती कार्यवाही करावी असे सूचना पालकमंत्र्यांनी केल्याचे सांगून या योजनेचा या २०० कुटुंबीयांना लाभ  मिळणार असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

           त्याबरोबरच ४ वर्षांपूर्वी पूर्णत्वास गेलेले कोटकामते  आरोग्य उपकेंद्र अद्यापही सुरू झाले नसून तांत्रिक बाबींची पूर्तता करून जिल्हा परिषद प्रशासनाने ते कार्यरत करावे अशी सूचनाही या जनता दरबार देण्यात आली.
 सिंधू रत्न योजनेअंतर्गत आंबा बागायत यांचा वनव्यापासून बचाव होण्याकरता बागायतीमधील वाढणारे तण गवत नष्ट करण्याकरता ७० टक्के अनुदानावर तणनाशके उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी केली आली असून ती देखील पूर्ण जाणार आहे. दहिबाव , मुणगे तोरसोळे ,कोटकामते , हिंदळे या गावांमध्ये सुमारे पारंपरिक पद्धतीने शेतपाट  असून या शेतपाट्यांचा सिंधुरत्न योजनेत समावेश करावा जेणेकरून या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना होऊन या ठिकाणी बारमाही शेती वाढेल व शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल. प्रधानमंत्री ग्राम विकास योजनेअंतर्गत नवीन रस्त्यांची मागणी या जनता दरबारात करण्यात येऊन या नवीन रस्त्यांमध्ये चाफेड गावठाणवाडी घाडी वाडी रस्ता, मुणगे बांबर वाडी, दहिबाव तांबळडेग,दाभोळे वरेरी ढोलवाडी, हे मार्ग सिमेंट काँक्रीटचे करण्यात येणार असून ते अधिक काळ टिकणारे असतील ग्रामीण भागात सिमेंट काँक्रीटचे रस्ते करण्याचा हा क्रांतिकारी योजना पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी घेतला असून आणि आमदार  नितेश राणे यांचे योगदान आहे यांच्या माध्यमातून ते पूर्णत्वास जाणार आहेत.देवगड तालुक्यातील विकास कामांचा बॅकगलॉग  गेल्या दोन वर्षात भरून निघाला असून कार्यक्षम पालकमंत्री रविंद्र चव्हाण आणि या विभागाचे आमदार नितेश राणे  यांचे यात सर्वाधिक योगदान असल्याचेही सदाशिव ओगले यांनी यावेळी बोलताना नमूद केले.
You cannot copy content of this page