सावंतवाडी : माडखोल येथील आत्महत्या प्रकरणात चुकीच्या पद्धतीने तपास करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याचा निषेध माडखोल ग्रामस्थांकडून करण्यात आला.यावेळी ग्रामस्थांनी पोलिस ठाण्यासमोर आत्मक्लेश आंदोलन केले. यावेळी पोलिस निरीक्षकांनी आंदोलकांना सामोरं जात त्यांच्या भावना समजून घेत कार्यवाहीच आश्वासन दिले. तर, राष्ट्रवादीच्या अर्चना घारेंनी देखील हा तपास योग्य रीतीने करा अशी मागणी यावेळी पोलिसांकडे केली.
यावेळी यावेळी राष्ट्रवादी श.प.च्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, बावळाट सरपंच सोनाली परब, माडखोल ग्रामस्थ राजकुमार राऊळ, संजय लाड, संतोष राऊळ, संतोष राणे, विशाल राऊळ, संदीप सुकी, मनोज घाटकर, संकेत राऊळ, उल्हास राणे, सत्यवान बंड, प्रमोद बंड, राष्ट्रवादी महिला शहराध्यक्षा अँड. सायली दुभाषी, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, हिदायतुल्ला खान यांसह माडखोल मेटवाडी ग्रामस्थ उपस्थित होते.
